आमच्या कुटुंबाबद्दल
ती. के. वि. बेलसरे व सौ. इंदिरा केशव बेलसरे यांच्यापश्चात त्यांचे सुपुत्र प्रा. श्रीपाद केशव बेलसरे, त्यांच्या पत्नी सौ. शाेभना श्रीपाद बेलसरे आणि त्यांच्या तीन कन्या कु. वैजयंतीमाला, सौ. कल्याणी व कु. मीरा असा बाबांचा परिवार हयात आहे.
प्रा. श्रीपाद बेलसरे (दादा) आणि सौ शोभना श्रीपाद बेलसरे (वहिनी) या दोघांनीही बाबांच्या पवित्र कार्यात मोठे योगदान दिलेले आहे. बाबांच्या पुस्तकांचे प्रकाशन तसेच त्यांच्या प्रवचनांचे व्हिडीओ रेकाॅडिंग करून, दादांनी हे सर्व अजरामर केले आहे. तर वहिनीं कुटुंबाच्या सर्व जबाबदाऱ्या खंबीरपणे व प्रेमाने पार पाडत असतात. बाबांचा मोठा जनसंग्रह यांनी अनेक वर्ष आपुलकीने जोपासला आहे. त्यांच्या अथक परिश्रमांची फळे आज आपण सर्व चाखत आहोत.
श्रीमहाराजांच्याच नव्हे तर ईश्वरचरणी रुजू झालेल्या इतर सर्व पंथातील साधकांस अध्यात्माचा हा अनमोल ठेवा मिळावा यासाठी या दोघांनीही बाबांचे कार्य त्यांच्यापश्चात अखंड चालू ठेविले आहे. जीवनातील इतर जबाबदाऱ्या चोख पार पाडत, अनेक अडचणी व प्रतिकूल परिस्तिथींचा सामना करून हे कार्य पुढे नेणे अत्यंत जिकिरीचे आहे, जे त्यांनी उत्तमपणे केले आहे.
श्रींच्या इच्छेने फळास आलेल्या बाबांच्या कार्याचा विस्तार फार मोठा आहे ज्यासाठी दादांच्या तीनही कन्या या कार्यात सर्वतोपरी हातभार लावत आहेत. आई- वडिलांप्रमाणेच हे कार्य त्यांच्याही जीवनाचे एक महत्वाचे उद्दिष्ट आहे. आजपर्यंत चालत आलेले हे कार्य यापुढेही असेच चालू रहावे आणि जनमानसापर्यंत पोहोचावे हीच आम्हा सर्वांची श्रींच्या चरणी प्रार्थना!
( डावीकडून उजवीकडे ) –
खालची रांग:
श्री. चेतन दिलीप नेगांधी, श्री. श्रीपाद बेलसरे, सौ. शोभना बेलसरे,
सौ. हंसा दिलीप नेगांधी.
वरची रांग:
डाॅ. मीरा बेलसरे, कु. शिवांगी नेगांधी, सौ. कल्याणी चेतन नेगांधी,
कु. वैजयंतीमाला बेलसरे.